केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार सुरू होणार

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार सुरू होणार

*कोकण  Express*

*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार सुरू होणार*

*राजन तेली; मग मंत्री असताना प्रकल्प आणण्यास दिपक केसरकरांचे हात कोणी धरले होते…*

*सावंतवाडी  ः प्रतिनिधी*

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार सुरू होणार आहे. मात्र ते आत्ताच सांगितले तर परिक्षेआधी पेपर फोडल्यासारखे होईल, असे मत भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केले. दरम्यान आता अम्युझमेंट पार्क आणि फाईव्ह स्टार हॉटेलची घोषणा करणार्‍या आमदार केसरकरांचा मंत्रीपदाच्या काळात कोणी हात धरला होता?, त्यावेळी त्यांनी हे का केले नाही?, असाही सवाल त्यांनी यावेळी केला.
श्री. तेली यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राणेंना केद्रीय मंत्रीपद मिळाल्याने जिल्ह्यात नवीन उद्योग येणार आहेत. रोजगाराची संधी निर्माण होणार आहे, अशी माहीती दिली. याबाबत अधिक विचारले असता त्यांनी हो लवकरच याबाबत राणे जाहीर करणार आहेत, आत्ताच सांगितले तर परिक्षेआधी पेपर फोडल्या सारखे होईल, असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!