*कोकण Express*
*कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शेकडोंच्या संख्येने शिवसैनिक एकवटले*
*आमदार वैभव नाईक, जिल्हाबँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे यांची प्रमुख उपस्थिती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे आज सायंकाळपासून शेकडोंच्या संख्येने शिवसैनिक एकवटले आहेत.यावेळी श्रीधर नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. आमदार वैभव नाईक, जिल्हाबँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिक कणकवलीत दाखल झाले आहेत. यावेळी शिवसेना जिंदाबाद..! , बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो..! उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है! अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. उपस्थितीबाबत कसलेही आवाहन न करताही शिवसैनिक स्वयंस्फूर्तीने कणकवली दाखल झाले आहेत.

