तळेबाजार येथील भीषण अपघातात गोविंद सारंग जागीच ठार

तळेबाजार येथील भीषण अपघातात गोविंद सारंग जागीच ठार

*कोकण Express*

*तळेबाजार येथील भीषण अपघातात गोविंद सारंग जागीच ठार*

*कोटकामते हायस्कूलचे शिक्षक व टेंबवली ग्रामपंचायत सदस्य गोविंद सारंग यांच्या कारचा भीषण अपघात*

नांदगाव वरून देवगड च्या दिशेने येत असताना तळेबाजार येथील भवानी मंगल कार्यालय नजीक गोविंद सहदेव सारंग वय 50 (रा. टेंबवली कालवी ) यांचा गाडीवरील ताबा सुटून अपघात झाला या अपघातात गोविंद सारंग जागीच ठार झाले असून सदरची घटना बुधवारी रात्री १०.१५ वा सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार गोविंद सारंग हे आपल्या ताब्यातील वॅगनार कार. एम. एच ०७ क्यू ४४७४ या कारणे मुली यशश्री हिच्यासोबत आपल्या टेंबवली कालवी येथील घरी येत असताना तळेबाजार भवानी मंगल कार्यालय नजीक गाडीवरील ताबा सुटून रस्त्यालगत असलेल्या कठड्याला आधळून गाडी पलटी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची मुलगी यशश्री हिला देखील गंभीर दुखापत झाल्याने तिला अधिक उपचारासाठी देवगड येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच गावासह अन्य आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.तसेच देवगड पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे,वाहतूक पोलीस मिलिंद परब,अमित हळदणकर,दशरथ चव्हाण,प्रशांत जाधव आदी पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!