*कोकण Express*
*शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मुकुंद शिनगारे यांची निवड…*
शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी श्री. मुकुंद शिनगारे तर सचिवपदी श्री शोभराज शेर्लेकर यांची निवड करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक गुणवत्तेत अग्रेसर राहण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जावेत असे माजी अध्यक्ष श्री सूर्यभान गोडे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. यावेळी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. श्री संतोष गोसावी यांची कार्याध्यक्षपदी तर सुनिता भाकरे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी व शैक्षणिक ध्येय धोरणे ठरविताना संघटनेस सहभागी करून घेणे बाबतचे निवेदन मा. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना देण्यात आले. शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या समस्येबाबत मा. शिक्षणाधिकारी आंबोकर साहेब यांनी सकारात्मक चर्चा करून समस्या सोडविण्यास नक्कीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवला जाईल असे सांगितले. यावेळी श्री रामचंद्र आंगणे, श्रीमती आवटी, श्रीमती कल्पना बोडके, श्री किशोर गवस, श्री निसार नदाफ, श्री संजय माने, श्री प्रजापती थोरात उपस्थित होते.