कणकवली केटी बंधाऱ्यावर दोन दुचाकीत भीषण अपघात

कणकवली केटी बंधाऱ्यावर दोन दुचाकीत भीषण अपघात

*कोकण Express*

*कणकवली केटी बंधाऱ्यावर दोन दुचाकीत भीषण अपघात..*

*केटी बंधार्‍यावरून युवती सुमारे विस फूट कोसळली नदीत; उपचारासाठी दाखल केले रुग्णालयामध्ये…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली मराठा मंडळ नजीक केटी बंधऱ्यांवरून जात असताना दोन दुचाकी मध्ये अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरुन कणकवलीतील दोघे ही थेट नदीत सुमारे २० फूट कोसळली. त्यात त्यांच्या डोके व कमरेला दुखापत झाली आहे. तर अधिक उपचारासाठी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले.

याबाबत अधिक वृत्त असे की, कणकवली येथील एक युवती आपल्या मैत्रिणी समवेत मालवणला मराठा मंडळ येथील केटी बंधार्‍यावरुन दुचाकी घेऊन जात होती. तेवढ्यात अन्य दुचाकीने ओसरगाव येथून कणकवली येथे येत असताना यावेळी समोरासमोर धडक झाली. हा अपघात साधारण ११.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात दुचाकीवरुन सदर युवती होती थेट नदीत कोसळली. ती युवती कणकवली तेली आळी येथील असल्याचे समजते. अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी सामाजिक कार्यकर्त्यांनी धाव घेतली. तेथील नदीत मासेमारी करण्यासाठी काही घोरपी समाजातील लोक उपस्थित होते. त्यांनी त्या युवतीला बाहेर काढले. तिला तातडीने घरी नेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अपघातस्थळी मोठी गर्दी झाली होती.

यावेळी बाळू पारकर,दामू सावंत, महेश लक्ष्मण घाडी,गावकर,राजन परब,चेतन मुंज,अण्णा कोदे,उत्तम राणे,श्री.वालावलकर,श्री.सापळे, श्री.मेस्त्री आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!