_नारायण राणेंना जामीन मंजूर, राणे विश्रांतीसाठी मुंबईकडे रवाना

_नारायण राणेंना जामीन मंजूर, राणे विश्रांतीसाठी मुंबईकडे रवाना

 *कोकण Express*

*_नारायण राणेंना जामीन मंजूर, राणे विश्रांतीसाठी मुंबईकडे रवाना…_*

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाडच्या सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

◾ *जमीन मंजुरी नंतरचे कोर्टाचे आदेश*

जामीन मिळाल्यानंतर राणे मुंबईकडे रवाना झाले आहेत. ते बुधवारी विश्रांती घेणार आहेत. त्यानंतर गुरुवारी किंवा शुक्रवारी पुन्हा यात्रा सुरू होणार असल्याची माहिती विरोधी पक्षनते प्रविण दरेकर यांनी दिली आहे.

नारायण राणे यांना जामीन मंजूर करताना कोर्टानं 31 ऑगस्ट आणि 13 सप्टेबरला रायगडच्या पोलीस अधीक्षकांकडे हजारी लावण्याचे आदेश दिलेत, अशी माहिती राणेंचे वकिल संग्राम देसाई यांनी माध्यमांना दिली आहे.

तसंच नारायण राणे यांना भविष्यात असं वक्तव्य न करण्याची ताकीद कोर्टानं दिली आहे. शिवाय पोलिसांना जेव्हा पाहिजे तेव्हा आवाजाचे नमुने उपलब्ध करून देण्याचे आदेश कोर्टानं राणेंना दिले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!