*कोकण Express*
*सावंतवाडीत शिवसेनेकडून केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य केल्या प्रकरणी सावंतवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने आज आमदार दिपक केसरकर यांच्या कार्यालयासमोर नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आहे. यावेळी शिवसैनिकांनी नारायण राणे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत पुतळा आपल्या ताब्यात घेतला आहे. यावेळी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी नारायण राणे यांच्यावर तातडीने कारवाई करून, गुन्हा दाखल करावा यासाठी पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्याकडे निवेदन दिले आहे.