*कोकण Express*
*आमने सामने या..दोन हात करून दाखवा;असं ट्विट निलेश राणेंनी केलं*
*सिंधुदुर्ग*
राज्यात राणे विरुद्ध शिवसेनेचे पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झाला आहे. दोन्ही बाजूनी आव्हान- प्रतिआव्हानांची भाषा सुरू झाली असून राणें विरोधात बॅनरबाजी करणाऱ्या शिवसैनिकांना भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी आव्हान दिलं आहे. “स्वतःच्या आईचं दूध पिलं असेल तर समोर या’ असं ट्विट निलेश राणेंनी केलं आहे.
नारायण राणे यांच्या उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेकडून ठिकठिकाणी राणेविरोधात बॅनरबाजी सुरू असून शिवसेनेचे नेते राणेंच्या विरोधात करत असलेल्या वक्तव्या नंतर निलेश राणे आक्रमक झाले आहेत. “कुठेतरी बॅनर लावा आणि मीडिया वर हात छाटण्याची वार्ता करून शिवसेनेला वाटत असेल की आम्हाला फरक पडतो तर त्यानी लक्षात घ्यावं आम्हाला काडीभर फरक पडत नाही. खऱ्या आईचं दूध पियाला असाल तर समोर या आणि दोन हात करा, तुमची औकात दाखवून देऊ.” असं ट्विट निलेश राणेंनी केलं आहे.