*कोकण Express*
*कोणत्या आदेशाने? अथवा कोणत्या आरोपाने ? आपण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अटक करता;आदेश दाखवाा*
आ. नितेश राणे व माजी खासदार निलेश राणे आ. प्रसाद लाड यांचे संगमेश्वर येथील पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या आंदोलन*
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना ताब्यात घेण्याचा आदेश दाखवा. अशी मागणी करत आमदार नितेश राणे व माजी खासदार निलेश राणे आमदार प्रसाद लाड यांनी संगमेश्वर येथील पोलीस स्टेशन मध्ये हे आंदोलन सुरू केले आहे.
कोणत्या आदेशाने? अथवा कोणत्या आरोपाने ? आपण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना घेऊन जात आहेत. तो आदेश दाखवा. असा आग्रह प्रसाद लाड व निलेश राणे यांनी धरला आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून पोलिस यंत्रणेचा दुरुपयोग केला जात असल्याची टीका केली आहे. यामुळे राज्यातील वातावरण गरम झाले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यानेही ट्विट करून या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे.