*कोकण Express*
*दोडामार्गात शिवसेनेकडून राणेंचा निषेध;पोलिसांनी घेतलं शिवसैनिकांना ताब्यात*
*गुन्हे दाखल होईपर्यंत राणेंना दोडामार्गात प्रवेश नाही:तालुकाप्रमुख बाबुराव धुरी*
*दोडामार्ग ः प्रथमेश*
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य करत शिवसैनिकांच्या भावना दुखवणारे वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात संपूर्ण राज्यात शिवसैनिकांनी आंदोलन सुरू केलं आहे.त्याच अनुषंगाने आज दोडामार्ग तालुका शिवसेनेच्या वतीने दोडामार्ग बाजारपेठेत मोर्चा काढत नारायण राणेंच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या निषेधाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.नारायण राणेंना अटक करा,उद्धव ठाकरे आगे बढो,हम तुम्हारे साथ है…शिवसेना झिंदाबाद… आदी घोषणा देण्यात आल्या.
दोडामार्ग येथील गांधी चौकात जोरदार घोषणाबाजी करणाऱ्या या शिवसैनिकांना दोडामार्ग पोलिसांनि ताब्यात घेतले.काही दिवसांपूर्वी भाजप-शिवसेना आमने सामने आले होते.त्यामुळे पुन्हा कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.