*कोकण Express*
*प्रथम मुख्यमंत्र्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाचा अपमान केलेला शिवसैनिकांना चालतो का?बाळासाहेबांनी तरी हे सहन केले असते का?तुम्हाला देशाचा अपमान चालतो.तुम्ही कशासाठी आंदोलन करता याचा तरी विचार करा.असा सल्ला देतानाच आलेल्या लोकांना शिवथाळी कशी द्यायची हे आम्हाला चांगलेच माहिती आहे.तूम्ही असाल तिथून लवकर या आमचे कार्यकर्ते थांबून कंटाळले आहेत.असा टोला लगावतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक तर जनतेची माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम.नितेश राणे यांनी केली. कणकवली येथे पत्रकारांशी बोलताना आम.नितेश राणे म्हणाले,जन आशीर्वाद यात्रा ही सुरुच राहणार आहे.कोणतेही आदेश नसताना प्रसार माध्यमाच्या आधारातून विपर्यास केला जात आहे.राज्याचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी देशाचा अपमान केला आहे.त्यांना हे माहिती नाही की देशाचा अमृत महोत्सव आहे.त्यांना हे अधिकाऱ्यांना विचारावं लागत.मुख्यमंत्री पदावर असलेल्या पदावरून विचारावं लागत हा आपल्या देशाचा अपमान नाही का?याबद्दल देशाचा नागरिक म्हणून आपल्याला चीड येत नाही का?प्रत्येकजण राणे यांच्या सारखे प्रसारमाध्यमासमोर बोलू शकत नाही.भावना व्यक्त करू शकत नाही.मात्र असंख्य देशवासियाच्या भावना दुखावल्या गेल्या.राज्याच्या प्रमुखाला देशाला किती वर्षे झाली हे माहिती नाही.मग मुख्यमंत्र्यावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल का होऊ शकत नाही.या घटनेबाबत नागरिक म्हणून संतप्त भावना व्यक्त झाल्या तर त्यात वावगे काय आहे.याबद्दल मुख्यमंत्री का माफी मागत नाही.त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा आधी दाखल करा. असे सांगतानाच आम्ही प्रथम नागरिक असून देशाचा अपमान केलेला शिवसैनिकांना चालतो का?बाळासाहेबांनी तरी हे सहन केले असते का?तुम्हाला देशाचा अपमान चालतो.तुम्ही कशासाठी आंदोलन करता याचा तरी विचार करा.आणि आलेल्या लोकांना शिवथाळी कशी द्यायची हे आम्हाला चांगलेच माहिती आहे.तूम्ही असाल तिथून लवकर या ,आमचे कार्यकर्ते थांबून कंटाळले आहेत.असा टोला लगावतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक तर जनतेची माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी आहे.कोणीही उठून देशाचा अपमान करायचा हे आम्ही का म्हणून सहन करायचे.हे सरकार हिंदूविरोधी सरकार आहेच पण देशविरोधीही सरकार आहे.देशाचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच संरक्षण करणार हे सरकार आहे का? असा सवाल आम.नितेश राणे यांनी केला.