*कोकण Express*
*भाजपा राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याच्या पाठीशी नसेल, परंतु भाजपा पूर्णपणे नारायण राणेंच्या पाठीशी*
*विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस*
*सिंधुदुर्ग*
‘एखाद्यानं गाय मारली तर आपण वासरू मारु’, अशाप्रकारे जर सरकार वागत असेल, तर एक स्पष्टपणे सांगतो की भाजपा राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याच्या पाठीशी नसेल, परंतु भाजपा पूर्णपणे नारायण राणेंच्या पाठीशी उभा राहिल, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंची पाठराखण केली आहे.
मुख्यामंत्र्यांविषयी बदनामीकारण वक्तव्य केल्यामुळे शिवसैनिकांनी नारायण राणेंविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची कारवाई सुरु झाली आहे. भाजपा कार्यालयावर कोणी हल्ला केला, तर तो सहन केला जाणार नाही. आम्ही हिंसा करत नाही. पोलिसांची जरी तुम्हाला मदत असली, तरी आम्ही त्यामुळे दबणारे नाही. काय काम करायचं ते कायद्यानं काम करा. बेकायदेशीर काम करणारे पोलिसवाले कुठे आहेत, ते आता मी सांगण्याची गरज नाही. सरकार बेकायदेशीरपणे पोलिसांचा गैरवापर करतेय. त्यामुळे संपूर्ण भाजपा नारायण राणेंच्या पाठीशी ठाम उभे राहणार, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.