*कोकण Express*
*_शिवसेना तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांनी नगराध्यक्ष संजू परब यांचा खोटेपणा आणला जनतेसमोर…..*
*पालकमंत्री नगरपालिकेला निधी देत नसल्याचा संजू परब यांनी केला होता आरोप_*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांनी पुन्हा एकदा सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांचा खोटेपणा जनते समोर आणला आहे. नगराध्यक्ष संजू परब यांनी पालकमंत्री उदय सामंत हे नगरपालिकेला विकास कामांसाठी निधी देत नसल्याचा आरोप केला होता.
परंतु तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांनी पालकमंत्री उदय सामंत यांनी सावंतवाडी शहराला विविध विकासकामांसाठी दिलेल्या निधी आणि विकास कामांची यादी जाहीर करत नगराध्यक्ष संजू परब कशा प्रकारे पत्रकार परिषद घेऊन सर्व सामान्य जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत याची पोलखोल केली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून आतापर्यंत कोट्यवधीचा निधी देण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.