*कोकण Express*
*नारायण राणेंच्या स्वागतासाठी कुडाळ भाजपाकडुन जोरदार तयारी*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने कुडाळ तालुक्याच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री राणेंचे जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे. यासाठी जोरदार तयारी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या सभामंडपाचे उद्घाटन भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते रणजित देसाई,कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे,प्रशांत राणे,नगराध्यक्ष ओंकार तेली,ओबीसी महीला मोर्च्याच्या जिल्हाध्यक्ष दिपलक्ष्मी पडते,राकेश नेमळेकर,नागेश नेमळेकर,महीला मोर्चा शहराध्यक्ष मंजिरी राणे,शुभम राणे,शहर अध्यक्ष राकेश कांदे,राजवीर पाटील,रेखा काणेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.