समाज कल्याण सभापती शारदा कांबळे यांनी आरोग्य सेविका काटकर यांचे केले अभिनंदन

समाज कल्याण सभापती शारदा कांबळे यांनी आरोग्य सेविका काटकर यांचे केले अभिनंदन

*कोकण Express*

*समाज कल्याण सभापती शारदा कांबळे यांनी आरोग्य सेविका काटकर यांचे केले अभिनंदन*

*नाधवडेत कोरोना रोखण्यासाठी घेतले अथक परिश्रम*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या नाधवडे गावच्या आरोग्यसेविका यु.एस. काटकर यांचे जि. प. समाज कल्याण सभापती शारदा कांबळे यांनी अभिनंदन केले. शारदा कांबळे यांनी नाधवडे आरोग्य उपकेंद्राला भेट दिली. तसेच गावातील दलित वस्तीत करण्यात आलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी जि. प. सदस्य सुधीर नकाशे, माजी सरपंच दादा पावसकर, भाजप नेते बंड्या मांजरेकर, संतोष यादव, रवींद्र गुंडये, बाळा पावसकर, राहुल इस्वलकर, सुरेंद्र यादव, ग्रामसेवक एन.डी.नदाफ व ग्रामस्थ उपस्थित होते. कोव्हीड काळात आरोग्यसेविका काटकर यांच्या बद्दल एकही तक्रार ग्रामस्थांची नाही. काटकर यांनी प्रामाणिकपणे व कर्तव्यभावनेने या काळात काम केले असल्याचे उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले. बौध्दवाडी येथील समाज मंदिरात शारदा कांबळे यांच्या उपस्थितीत विकास कामाचा आढावा घेण्यात आला. स्मशानशेड व स्ट्रीट लाईट सभापती कांबळे यांनी मंजूर करून दिल्याबद्दल उपस्थित ग्रामस्थांनी कांबळे यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!