बेळणे येथे भीषण अपघात

बेळणे येथे भीषण अपघात

*कोकण  Express*

*बेळणे येथे भीषण अपघात*

*झोप आल्याने चालकाचा ताबा सुटला; तिघेजण झाले जखमी…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कोल्हापूर येथून कणकवलीला भाजी विक्रेते कुतुबुद्दीन हुसैन शेख (वय -४८ वर्षे, रा.हरकुळ बुदृक) हे भाजी विक्रीचा व्यावसायासाठी भाजी घेऊन येत होते.महिंद्रा टेम्पो बेळणे येथे आला असता चालक योगेश्वार प्रशांत मेस्त्री (रा.हरकुळ बुदृक सुतारवाडी ता.कणकवली) याला झोप आल्याने गाडीवरील ताबा सुटला आणि टेम्पो डीव्हायडरवर चढल्याने रविवारी पहाटे ३.३० वाजता अपघात घडला. या अपघातात दोन किरकोळ,तर एक गंभीर असे तिघेजण जखमी झाले आहेत.सर्व जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,
फिर्यादी कुतुबुद्दीन हुसैन शेख व त्यांचा मुलगा मोहंमदसोहेल खुतुबुदृदीन शेख व चालक योगेश्वार मेस्त्री असे माझ्या मालकीची महींद्रा सुप्रो टेम्पो(एम. एच. ०७ एजे. २३९६) ही घेऊन शनिवारी दुपारी कणकवली येथुन भाजी आणणेकामी कोल्हापुर येथे गेले होते. भाजी घेवुन रात्री १२ वाजताचे दरम्याने गावी हरकुळ बुदृक येथे येण्यास निघाले असताना पहाटे ३.३० वाजताचे दरम्याने मुंबई – गोवा महामार्गवरुन कणकवलीच्या दिशेने येत असताना बेळणे निसर्ग हॉटेल येथे गाडीवरील चालक योगेश्वर प्रशांत मेस्त्री याचा गाडीवरील ताबा सुटुन गाडी डीव्हायडरवर चढुन रस्त्याच्या पलीकडील उजव्या बाजुस असलेल्या दगडावर आपटुन ड्रायव्हर साईडच्या बाजुने पलटी झाली आहे.

या अपघातात कुतुबुद्दीन हुसैन शेख यांच्या उजव्या हाताच्या अंगठयास तसेच छातीत दुखापत झाली असुन मुलगा मोहंमदसोहेल शेख याला डोकीस व डावे मांडीस व डावे कुशीस दुखापत झाली तर चालक योगेश्वर प्रशांत मेस्त्री यास डोकीस डाव्या खांदयास व दोन्ही हातास खरचटलेले आहे.तसेच गाडीचे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी चालक योगेश्वर मेस्त्री याने रस्त्याचे विशिष्ठ परीस्थितीकडे दुर्लक्ष करून गाडी हयगयीने व बेदकारपणे चालवून अपघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळी पोलीस नाईक सुयोग पोकळे,प्रवीण पार्सेकर, हवालदार यु.डी.वंजारे यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.अधिक तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!