*कोकण Express*
*तोंडवलीत झाले लसिकरण ; शिवसेनेच्या मागणीला यश*
*कणकवली ः प्रतिनिधी*
तोंडवलीत शिवसेनेच्या वतीने आरोग्य विभाग कडे लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती.या मागणीला यश मिळाले असून आज तोंडवली प्राथमिक शाळा नं-१ येथे कोविड शिल्ड चे डोस लसिकरण करण्यात आले असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
कणकवली तालुक्यातील तोंडवली बावशी गृप ग्रामपंचायत येथे तोंडवली गाव कासार्डे आरोग्य केंद्राला जोडलेले आहे तर बावशी गाव नांदगाव आरोग्य
केंद्राला जोडलेले आहे. तोंडवली गावातील लोकांना कोरोना प्रतिबंधक लसिकरणासाठी अंतर जास्त पडत असल्याने तोंडवली शिवसेनेच्या वतीने आरोग्य विभाग कडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती.या मागणीला यश मिळाले आहे.तोंडवलीती ग्रामस्थांनी ला लसीकरण मोहीम ला चांगला प्रतिसाद दिला .ज्यांना अजूनही लस मिळाली नाही त्या ग्रामस्थांसाठी परत लवकरच लसीकरण मोहीम राबवणार असल्याची माहिती शिवसेने कडून देणायत आली
यावेळी आरोग्य सेविका मास्के, आरोग्य सेवक निलेश सामंत,आशा सेविका श्रुती कुडतरकर, अंगणवाडी सेविका मत्तलवार तसेच आबु मेस्त्री, अतुल सदडेकर ,तात्या निकम,तेजस बोभाटे ,अमोल मेस्त्री,अमित इस्वलकर, महेंद्र इस्वलकर आदी उपस्थित