जनकल्याण संस्थेचे कार्य कौतुकास्पद – जि.प .सदस्य सुधीर नकाशे

जनकल्याण संस्थेचे कार्य कौतुकास्पद – जि.प .सदस्य सुधीर नकाशे

*कोकण Express*

*जनकल्याण संस्थेचे कार्य कौतुकास्पद – जि.प .सदस्य सुधीर नकाशे…*

*वैभववाडी ः  प्रतिनिधी*

नापणे गावातील लोकांसाठी covid-19 लसीकरण कॅम्प आयोजित करावा अशी मागणी, जनकल्याण संस्थेच्या वतीने करण्यात आली होती. शुक्रवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी 80 ढोस देण्यात आले होते. व्यवस्थित नियोजन केल्यामुळे हा कॅम्प सुरळीत पार पडलाा. उर्वरित लोकांसाठी ही लवकरच ढोस देण्यात येतील आणि नापणे गाव संपूर्ण लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करू. असे यावेळी वैद्यकीय अधिकारी श्री चव्हाण यांनी सांगितले.

कोव्हिड 19 लसिकरणाचे महत्व हळूहळू लोकांना कळू लागले आहे,  म्हणूनच रात्री-अपरात्री रांगा लावून नागरिक लसीकरणाचा लाभ घेत आहेत. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्धांना लस मिळणे कठीण बनले आहे. अशावेळी नापणे गावातील लोकांसाठी जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेने covid-19 लसीकरण कॅम्प आयोजित करून गावातील लोकांची गौरसोय दूर केली. त्याबद्दल संस्थेला धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत, असे उद्गार जि.प .सदस्य सुधीर नकाशे यांनी केले.

लसीकरण केंद्राचे उद्घाटन सभापती अक्षता डाफळे,जि.प.सदस्य सुधीर नकाशे,यांच्या  हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी श्री.चव्हाण ,सरपंच जयप्रकाश यादव,किशोर जैतापकर, सदस्य नारायण गुरव,चंद्रकांत बोडेकर,प्रकाश यादव,पोलिस पाटील दिपक पाटील, उदय जैतापकर, विनोद जठार,माजी सरपंच राजश्री लाड, प्रदिप जैतापकर, महेंद्र यादव,दिनेश यादव,संजय पाटील, रमाकांत पाटील, सुरेश काळे,परशुराम पाटील, आरोग्‍य सेवक एस.एस.मांडवकर, CHO ज्ञानदेवभारत लोंढे,आरोग्‍य सेविका एस.आर.माने,एस.एम.भोगटे,आशा सायली यादव,अ.से.शितल शिंदे, सायली सुतार, लिना पाटील इत्यादीं उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!