*कोकण Express*
*कणकवली शहरात यात्रेचे ‘भूतो ना भविष्य’ असे स्वागत होणार…*
*नगराध्यक्षांची माहिती; जन आशीर्वाद यात्रा २५ ऑगस्टला सिंधुदुर्गात दाखल…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा २५ ऑगस्टला सिंधुदुर्गात दाखल होणार आहे.कणकवली शहरात यात्रेचे ‘भूतो ना भविष्य’ असे स्वागत करण्यात येणार आहे,अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली आहे.
या यात्रेचे जिल्ह्यात स्वागत करण्यासाठी भाजपतर्फे जंगी तयारी करण्यात आली आहे.यात्रेच्या निमित्ताने शहरात ठिक ठिकाणी नारायण राणे यांच्या स्वागताचे बॅनर झळकत असून हे बॅनर लक्षवेधी ठरत आहेत. केंद्रीय मंत्री पदी राणेंची वर्णी लागल्या नंतर श्री.राणे जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून ते जिल्ह्यात दाखल होणार आहेत.यांच्या या दौऱ्याने स्थानिक नेते व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून राणेंच्या स्वागतासाठी कंबर कसली आहे.ही यात्रा अविस्मरणीय ठरण्याच्या दृष्टीने कार्यकर्ते जोरदार कामाला लागले आहेत.

