*कोकण Express*
*तोंडवलीत उद्या होणार लसिकरण, ग्रामपंचायतीच्या मागणीला यश*
*उपसरपंच अशोक बोभाटे यांनी दिले होते निवेदन पत्र*
तोंडवली बावशी ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ संजना सावंत यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती.या मागणीला यश मिळाले असून उद्या तोंडवली शाळा नं-१ येथे कोविड शिल्ड चे डोस आलेले असल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्षा सौ संजना सावंत यांचे आभार मानले आहेत.
कणकवली तालुक्यातील तोंडवली बावशी गृप ग्रामपंचायत येथे तोंडवली गाव कासार्डे आरोग्य केंद्राला जोडलेले आहे तर बावशी गाव नांदगाव आरोग्य
केंद्राला जोडलेले आहे. तोंडवली गावातील लोकांना कोरोना प्रतिबंधक लसिकरणासाठी अंतर जास्त पडत असल्याने तोंडवली बावशी ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ संजना सावंत यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती.या मागणीला यश मिळाले असून उद्या तोंडवली शाळा नं 1 येथे कोविड शिल्ड चे डोस आलेले असल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्षा सौ संजना सावंत यांचे आभार मानले आहेत
