शालेय अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आरोपीला जामीन

शालेय अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आरोपीला जामीन

*कोकण Express*

*शालेय अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आरोपीला जामीन*

तोरसोळे येथील 16 वर्षीय शालेय विद्यार्थिनीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी अटक झालेला संशयित आरोपी अमर भरत कदम याला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने 30 हजार रुपये जामीनावर सुटका केली आहे. या कामी संशयित आरोपीच्या वतीने ॲड. कौस्तुभ मराठे यांनी काम पाहिले.

19 जून 2021 रोजी तोरसोळे येथील अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीला तिच्या राहत्या घरातून पालकांचे अपरोक्ष् पळवून अज्ञात ठिकाणी घेवून गेल्याची फिर्याद पिडीतेच्या वडिलांनी देवगड पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती. सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपी याने पिडीत मुलीवर शिरगांव येथे पहाटेच्या वेळी जबरदस्तीने बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे संशयित आरोपीविरुध्द देवगड पोलीस स्टेशन येथे पोक्सो कायदा कलम 4, 8, 12 व भा. दं. वि. कलम 376 (3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासकामी देवगड पोलीसांनी तात्काळ सुत्रे हाताळून 20 जून 2021 रोजी संशयित आरोपी अमर भरत कदम रा. तोरसोळे (बौध्दवाडी) येथे अटक केली होती. संशयित आरोपीच्या ताब्यातून सदर मुलीची सुटका करुन तिला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले होते. आरोपीला न्यायालयीन कोठडीत सावंतवाडी जिल्हा कारागृह येथे ठेवण्यात आले होते. तथापि अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर करीत त्याची 30 हजार रुपये जामीनावर सुटका केली आहे. या कामी संशयित आरोपीचे वतीने ॲड. कौस्तुभ मराठे यांनी काम पाहिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!