‘मनसेचे अप्पर जिल्हाधिकारी हटाव आणि पर्यावरण बचाव’ आंदोलन २३ आॕगस्टला

‘मनसेचे अप्पर जिल्हाधिकारी हटाव आणि पर्यावरण बचाव’ आंदोलन २३ आॕगस्टला

*कोकण Express*

*‘मनसेचे अप्पर जिल्हाधिकारी हटाव आणि पर्यावरण बचाव’ आंदोलन २३ आॕगस्टला*

*मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची माहिती*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यावरणाला मारक ठरणारे जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी मनसेतर्फे पर्यावरण दिनी करण्यात आली होती. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना हटवण्यात आले नाही, तर मनसे ‘अप्पर जिल्हाधिकारी हटाव आणि पर्यावरण बचाव’ अशाप्रकारचे आंदोलन करेल, असा इशाराही मनसेतर्फे देण्यात आला होता. परंतु त्याची दखल न घेतल्याने मनसे २३आॕगस्टपासून ‘अप्पर जिल्हाधिकारी हटाव आणि पर्यावरण बचाव’ असे आंदोलन करणार असल्याची माहिती मानसे जिल्हा सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पत्रकारपरिषदेत दिली आहे.

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांमुळे जिल्हातील मायनिंग माफियांना संधी मिळालेली आहे. इको सेंसिटिव्ह झोनमध्येही या मायनिंग धारकांना संधी दिली जातेय. अनेक ठिकाणी २० फुटांपर्यंत खोदण्याची परवानगीही मिळालीय. कित्तेकांनी अगदी ४० – ४० फुटांपर्यंतही उत्खनन केलेलं आहे. परंतु त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. तसेच त्या खाणीलाही कधी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली नाही. अप्पर जिल्हाधिकारी आणि तत्कालीन मायनिंग आॕफिसरनी या सर्व खाणमाफीयांना एवढी सूट दिलीय, की या खाणी पर्यावरणाला घातक ठरू लागल्यात. कळणे मायनिंगमुळे कळणेवासियांचं भरपूर नुकसान झालं. परंतु त्या मायनिंग धारकांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. अशा अनेक ठिकाणी मायनिंगच्या समस्येने डोके वर काढले आहे. परवानगी नसलेल्या जागेतही उत्खनन केले जातेय. याकडे कोणीही लक्ष देत नाही. रेडीच्या खाणीत पाच पंपांची परवानगी असताना सात पंप लावून खाणीतील गढूळ पाणी समुद्रात सोडले जात आहे. एकंदर हा पर्यावरणाचा ऱ्हास चाललेला आहे. कासार्डे येथील इको सेंसिटिव्ह झोनमध्ये असलेल्या खाणींना मनसेने विरोध केल्याने आता स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे अशा पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांविरूद्ध मनसे आंदोलन करणार असून त्याचे निवेदन जिल्हाधिकारी आणि एसपींना देण्यात आले आहे, असे परशुराम उपरकर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!