*कोकण Express*
*प्रमुख राजकीय पक्षाचा जिल्हाध्यक्ष कार्यकारिणीसहित रा. काँ. मध्ये प्रवेश करणार…*
*राजकीय क्षेत्रात खळबळ, उद्याच्या प्रवेशाकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
एका प्रमुख राजकीय पक्षाचा जिल्हाध्यक्ष कार्यकारणी सहित उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका राजकीय पक्षाचा जिल्हाध्यक्ष उद्या शनिवारी आमदार शेखर निकम यांच्या आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या ऑनलाईन उपस्थितीत प्रवेश करणार आहे.सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीची जिल्हा कार्यकारणी बैठक कुडाळ येथील हॉटेल आरएसएनचे मागे वासुदेवानंद हॉल येथे सकाळी १० वा होणार असून यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष प्रवेश करणार आहे यामुळे जिल्ह्यात राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडणार आहे, त्याच बरोबर इतर पक्षातील सुद्धा अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी म्हटले आहे.