*कोकण Express*
*देवगड | मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यांचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते*
फडणवीस सरकारच्या काळात मंजूर झालेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यांचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. या दोन्ही रस्त्यामध्ये तीन कोटी 50 लाख खर्चाचा पोयरे ते मशवी पर्यंत जाणारा रस्ता व दोन कोटी दहा लाख रुपये खर्चाचा किंजवडे चिरेखाण रस्ता ते हायस्कूल पर्यंत जाणारा रस्ता यांचा समावेश आहे.
यामुळे नागरिकांची फार मोठी सोय होणार आहे पोयरे येथील रस्त्याचे भूमिपूजन करताना सभापती सुनील उर्फ भाई पारकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश राणे संदीप साटम व पोयरे सरपंच उपस्थित होते तर किंजवडे येथील रस्त्याचे भूमिपूजन करताना भाजपाचे तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर सभापती सुनील पारकर जि प सदस्य मनस्वी घारे सदा ओगले प्रकाश राणे संदीप साटम माजी सभापती रवींद्र जोगल युवक सेलचे तालुकाध्यक्ष अमित साटम योगेश पाटकर ओमकार खाजणवाडकर उपस्थित होते.