माडखोल लघुपाटबंधारे धरणाच्या कालव्याच्या कामातील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होणार

माडखोल लघुपाटबंधारे धरणाच्या कालव्याच्या कामातील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होणार

*कोकण  Express*

*माडखोल लघुपाटबंधारे धरणाच्या कालव्याच्या कामातील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होणार*

*खास. विनायक राऊत यांची अधिकाऱ्यासमवेत चर्चा*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

माडखोल येथील पाणी वापर संस्था सदस्यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आज गुरुवारी खासदार विनायक राऊत आणि आमदार दिपक केसरकर यांनी अधिकाऱ्यांसह माडखोल धरणाची पाहणी केली आहे.यावेळी माडखोल ग्रामस्थांनी मांडत झालेला भ्रष्टाचाराची कसून चौकशी व्हावी अशी मागणी केली. त्यावेळी खासदार विनायक राऊत यांनी लवकरच अधीक्षक अभियंता यांच्यासोबत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेऊ. भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यात येईल. या कालव्याची कामे जलद गतीने व्हावे म्हणून अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात येईल असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी यावेळी व्यक्त केला आहे. माडखोल लघु पाटबंधारे कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या याविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनी त्यांनाच जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता परंतु पालकमंत्री उदय सामंत यांनी या आंदोलनाची तात्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्याची उचलबांगडी करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!