स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी नारायण राणे झाले लीन…!

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी नारायण राणे झाले लीन…!

*कोकण Express*

*स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी नारायण राणे झाले लीन…!*

*स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी नारायण राणे झाले लीन…!*

*मुंबई* 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा दादर शिवाजी पार्क येथे दाखल झाली आहे. यावेळी नारायण राणे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्मारकावर लीन झाले आहेत. पहिल्यांदाच नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला आज भेट दिली आहे.

खास. विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना शिवसैनिक स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी भेट देऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. शिवसेनेचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू नारायण राणे आहेत. बाळासाहेब ठाकरेंचा त्यांनी विश्वासघात केला आहे. त्यामुळे राणेंना बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी जाऊ देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. या पार्श्वभूमीसह नारायण राणे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी भेट देतात का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. परंतु नंतर शिवसेना नारायण राणेंना स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट देण्यापासून अडवणार नाही, अशी भूमिका नंतर शिवसेनेने घेतल्याने राणे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी दाखल झाले. बाळासाहेबांना आवडणारी चाफ्याची फुले त्यांच्या स्मृतीस्थळावर अर्पण करत राणेंनी बाळासाहेब यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं. शिवसेनेसोबत आणि उद्धव ठाकरेंसोबत कितीही टोकाचं वैर असलं, तरीही स्व. बाळासाहेबांविषयी राणेंच्या मनात असलेला आदर जगजाहिर आहे. बाळासाहेबांच्या अंत्यविधीवेळी राणे परदेशात असल्याने बळासाहेबांचं दर्शन ते घेऊ शकले नव्हते. आज त्यांनी प्रथमच स्व. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी स्वा. सावरकरांच्या स्मारकाचंही दर्शन घेतलं आहे.

आज मी जो काही आहे तो बाळासाहेबांमुळे आहे. बाळासाहेबांनीच मला घडवलं आहे. आजही ते असते तर म्हणाले असते, नारायण तू असंच यश मिळव. माझे आशीर्वाद आहेत. आणि डोक्यावर हात ठेवला असता. आज जरी हात नसला, तरी साहेबाबचे आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहेत. अशी माझी समज आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीचं स्मारक असो, दैवताचं स्मारक असो, त्याला विरोधाची भाषा करू नये. भावनेचा विचार करावा आणि तसं वक्तव्य करावं. ही जनआशीर्वाद यात्रा यशस्वी होईल. येणारी महानगारपालिका भाजप जिंकणार आणि ३२ वर्षाचा पापाचा घडा फुटणार’, असे नारायण राणे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!