*कोकण Express*
*हरकुळ बुद्रुक येथील श्रेया घाडीचा सन्मान!*
*डोंबिवली; आदर्श बाल गौरव कलारत्न किड्स अचिव्हर्स आयकॉन अवॉर्ड्स प्रदान!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मनुष्य विकास लोकसेवा अकादमी, मुंबई या संस्थेच्यावतीने ‘राज्यस्तरीय गुणीजन गौरव पुरस्कार २०२०’ सोहळ्याचे आॅनलाइन आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याअंतर्गत कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील मूळ रहिवासी तथा डोंबिवली, विष्णूनगर येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे शिक्षण घेणाऱ्या व नृत्यकला निपूण असलेल्या श्रेया सुंदर घाडी हिला आदर्श बाल गौरव कलारत्न किड्स अचिव्हर्स आयकॉन अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले आहे.
सेवानिवृत्त शिक्षक रघुनाथ सदाशिव घाडी यांची नात असलेल्या श्रेया हिने नृत्यविष्काराच्या जोरावर रसिक मनावर आपला वेगळा ठसा उमटविला आहे. अकरा वर्षाच्या श्रेया हीने आपल्या वयाच्या चौथ्या वर्षापासून आतापर्यंत बऱ्याच राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे.
देशाच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तीला तीच्या डान्स क्लास मध्ये स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेतील शिक्षीका रूपाली जाधव, शुभांगी जोशी आणि तीचे गुरू प्रशांत वसंत आंबडस्कर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
तीने आतापर्यंत राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये ‘मीच महाराष्ट्राची लावण्यवती’, ‘लावणी सम्राज्ञी’, ‘पदन्यास’, सह्याद्री वाहिनी वरचा ‘डान्सिंग स्टार ,शोध नव्या डान्सचा ‘तसेच ऑनलाइन राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धे मध्ये पण यश संपादन केले आहे.तीने आतापर्यंत आधार रत्न पुरस्कार, घाडीगावकर समाज विशेष कर्तृत्व सन्मान (कला नृत्य) पुरस्कार मिळवले आहेत. आतापर्यंत तीने १०० नृत्यस्पर्धांमध्ये विजेती ठरली आहे.
या सिंधुकन्येने आपल्या कलाविष्काराने अनेकांना भुरळ घातली आहे.ती डोंबिवली तील सायरन डान्स अॅकॅडमी मध्ये नृत्याचे शिक्षण घेत आहे. तीने आपल्या यशाचे श्रेय आई, वडील व गुरू नृत्यदिग्दर्शक प्रशांत आंबडस्कर तसेच स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णूनगर शाळेतील सर्व शिक्षकांना दिले आहे.