नगराध्यक्ष संजू परब यांचे अवघ्या सहा महिन्यात सर्वात चांगले काम

नगराध्यक्ष संजू परब यांचे अवघ्या सहा महिन्यात सर्वात चांगले काम

*कोकण  Express*

*नगराध्यक्ष संजू परब यांचे अवघ्या सहा महिन्यात सर्वात चांगले काम…*

*“कोकण बेल्ट”मध्ये ते चर्चेत असलेले भाजपचे एकमेव नगराध्यक्ष ; राजन तेली*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

नगराध्यक्ष संजू परब यांनी अवघ्या सहा महिन्यात सर्वात चांगले काम केले आहे.त्यामुळे अवघ्या “कोकण बेल्ट”मध्ये ते चर्चेत असलेले भाजपचे एकमेव नगराध्यक्ष ठरले आहेत. टिका टिप्पणी होतच राहील परंतु तुम्ही प्रामाणिक काम करा, यश निश्चितच मिळेल, अशा शुभेच्छा भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे नगराध्यक्ष परब यांना दिल्या. दरम्यान दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या खासगी एका चर्चेत मी तुमचा पुढचा वारसदार मी आहे, असे परब म्हणाले होते. परंतु राजकारण काय चालतच राहिली फक्त माझ्या प्रॉपर्टीत वारसदार होऊ नका, असे राजन तेली यांनी त्यांना मिश्किलपणे सांगितले. श्री परब यांचा वाढदिवस आज कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर,नगरसेवक आनंद नेवगी,मनोज नाईक,दिपाली भालेकर,अजय गोंदावले,प्रमोद कामत,जावेद खतीब,पंकज पेडणेकर,शितल राऊळ,अनिल निरवडेकर,मेघना साळगावकर,रवी मडगावकर,मोहिनी मडगावकर,निशांत तोरसकर,अजय सावंत,अमित परब,राजू बेग,गुरुनाथ पेडणेकर महेश धुरी,अनारोजीन लोबो,गुणाजी गावडे,दिलीप भालेकर,देविदास आडारकर,बंटी पुरोहित,महेश पांचाळ आदी उपस्थित होते.
श्री,तेली पुढे म्हणाले, नगराध्यक्ष पदावर श्री.परब विराजमान झाल्यानंतर त्यांनी शहरातील अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. येथील पालिकेच्या स्विमिंग टॅंकचे काम सुद्धा त्यांनी अतिशय उत्तम दर्जाचे करून घेतले आहे.तर शहरातील काझी शहाबुद्दीन हॉलसह अनेक कामांचे नूतनीकरण त्यांनी केले आहे. दरम्यान त्यांच्या या प्रवासात विरोधकांकडून अनेक टीका-आंदोलने झाली. मात्र त्यांना न जुमानता आपला प्रवास श्री.परब यांनी सुरू ठेवला आहे.असे सांगत श्री.तेली यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी येथील पालिकेतील दहा सफाई कर्मचाऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. दरम्यान या प्रसंगी बोलताना श्री.परब यांनी आपल्या सहकार्‍यांचे व उपस्थितांचे आभार मानत यापुढेही आपलं प्रेम व आशीर्वाद असेच सदैव पाठीशी असू द्या,अशी मनोकामना व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!