*कोकण Express*
*अंगणवाडी सेविका आपले मोबाईल एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयात परत करणार*
*ओरोस ः प्रतिनिधी*
अंणवाडी सेवीकांना शासकीय कामासाठी देण्यात आलेले मोबाईल निकृष्ट व सदोष असल्यामुळे चांगल्या प्रतीचे मोबाईल द्या सेविकांना मराठी भाषेमध्ये निर्दोष पोषण ट्रॅकर ॲप द्या या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी गेले पंधरा दिवसात सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांकडे या मागण्या लेखी सादर केल्या आहेत .परंतु शासनाकडून काहीही प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविकांनी 17 ऑगस्ट पासून मोबाईल वरून काम बंद केले आहे सिंधुदुर्गात 20 ऑगस्टपासून अंगणवाडी सेविका आपले मोबाईल एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयात परत करणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने कमलताई परुळेकर यांनी दिली आहे . कुडाळ येथे 20 ऑगस्ट सावंतवाडी येथे 23 रोजी कणकवली येथे 24 रोजी दोडामार्ग येथे 25 रोजी वेंगुर्ले येथे 26 रोजी देवगड येथे 27 ऑगस्ट सप्टेंबर मालवण येथे 1 सप्टेंबर वैभववाडी येथे 2 सप्टेंबर रोजी कमलताई परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचारी आंदोलन छेडणार आहेत . शासनामार्फत अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिले आहेत मात्र ते निकृष्ट असल्याने दुरुस्तीसाठी सेविकांना खर्च करावा लागत आहे.