*कोकण Express*
*वरवडे नळयोजना डीपी अखेर सुरक्षितस्थळी हलविली*
*कणकवली ः प्रतिनिधी*
वरवडे गावच्या मुख्य नळयोजनेच्या ट्रान्सफॉर्मर-डीपी सुरक्षितस्थळी हलविण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. गेले काही महिने यासाठी मागणी करण्यात आलेली होती. भाजपा तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली होती. व हा प्रश्न सोडविला आहे. यावेळी सदरची डीपी नदीपात्रालगत असल्याने व लाईनही पाण्यातूनच येत असल्याने येणाऱ्या समस्याबाबत पुन्हा चर्चा करण्यात आली होती. नदीला पूर येतो, त्यावेळी सदर ठिकाणी जाता येत नाही. त्यामुळे 4-5 दिवसांपर्यंत योजना बंद राहते, याकडे लक्ष वेधण्यात आले होते. यावेळी आठ दिवसात कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार सदरची लाईन रस्त्याच्या बाजूने पोल उभे करून घेत योजनेच्या पंप शेड लगत डिपी बसवण्यात आला आहे. सदरच्या कामाची पाहणी भाजपा तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत यांनी नुकतीच केली सोबत वरवडे प.स.शक्तिकेंद्रप्रमुख सदा चव्हाण,उपसरपंच सिरील फर्नांडिस, ग्रा.प.सदस्य अमोल बोन्द्रे, प्रदीप घाडीगांवकर, प्रमोद गावडे, ग्रामसेवक पावसकर, हनुमंत बोन्द्रे, विजय कदम, रतन देसाई, संजय सावंत, अनिल घाडीगांवकर, रमा घाडीगांवकर, गुरुदास घाडीगांवकर इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. गेल्या कित्येक वर्षाचा प्रश्न मिटल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.