भाजपा संघटनेचे काम एक सुर एक ताल

भाजपा संघटनेचे काम एक सुर एक ताल

 

*कोकण Express*

*भाजपा संघटनेचे काम एक सुर एक ताल – शैलेंद्र दळवी*

*वैभववाडी भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

भारतीय जनता पार्टी पक्ष संघटनेचे काम जिल्ह्यात एकसंघपणे सुरु आहे. संघटनेच्या कामाची पद्धत खूप वाखाणण्याजोगी आहे. संघटनेतील पदाधिकारी हे खूप अनुभवी आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्चित पार्टीला होईल. भाजपा संघटनेचे काम एक सुर एक ताल. असे प्रतिपादन भाजपा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे संघटनमंत्री शैलेंद्र दळवी यांनी केले.
वैभववाडी भाजपा कार्यालयात श्री. दळवी यांनी भेट देत प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जि. बँ. संचालक अतुल काळसेकर, तालुकाध्यक्ष नासीर काझी, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, सभापती अक्षता डाफळे, जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण, जि. प. सदस्य सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, अरविंद रावराणे, दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, किशोर दळवी, बाबा कोकाटे, स्नेहलता चोरगे, भारती रावराणे, सुनील रावराणे, संतोष पवार, संजय सावंत, हर्षदा हरयाण, बाळा हरयाण, प्रकाश पाटील, प्रदीप नारकर, आप्पा खानविलकर, रत्नाकर कदम, पप्पू इंदुलकर व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. दळवी म्हणाले, आपण आता सर्व भाजपमय झालो आहोत. भाजप संघटना ही एक सूर एक ताल अशी आहे. थेट निर्णय तळागाळापर्यंत संघटनेचे पोहोचवले जातात. आदरणीय नेते नारायण राणे यांच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे राहुया असे सांगितले. राजन तेली म्हणाले, तालुक्यातील सर्व आघाड्यांचे काम कौतुकास पात्र आहे. सगळे कार्यक्रम तालुक्यात एक संघ पणे राबविले जात आहेत. पुढील सर्व निवडणुका पक्षाच्या झेंड्याखाली लढवून शंभर टक्के यश मिळवूया असे आवाहन केले. अतुल काळसेकर, प्रमोद रावराणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बाळा हरयाण यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!