_निवृत्तीचं वय, पेन्शन वाढण्याची शक्यता; जाणून घ्या सरकारची योजना…_

_निवृत्तीचं वय, पेन्शन वाढण्याची शक्यता; जाणून घ्या सरकारची योजना…_

 *कोकण Express*

*_निवृत्तीचं वय, पेन्शन वाढण्याची शक्यता; जाणून घ्या सरकारची योजना…_*

◾ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. कारण आता त्यांचं निवृत्तीचं वय आणि पेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पंतप्रधनांच्या आर्थिक सल्लागार समितीच्यावतीनं सरकारला काही सूचना करण्यात आल्या आहेत.

◾ *काय आहे ‘ही’ योजना?*

■ सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याला कमीत कमी २,००० रुपये पेन्शन दिली जावी. याद्वारे आर्थिक सल्लागार समितीनं देशात ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी चांगल्या सुविधा निर्माण करण्याची शिफारस केली आहे.
■ त्याचबरोबर जर अधिक वय असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवायची असेल तर त्यांचं निवृत्तीचं वय वाढवणं अत्यावश्यक असल्याचंही यामध्ये म्हटलं आहे.
■ सामाजिक सुरक्षा यंत्रणेवरील दबाव कमी करण्यासाठी असं केलं जाऊ शकतं.
■ तसेच ५० वर्षांवरील नागरिकांसाठी स्कील डेव्हलपमेंट कार्यक्रम सुरु करण्यासंदर्भात मागणी यामध्ये करण्यात आली आहे.
■ वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्टस २०१९ नुसार, सन २०५० पर्यंत भारतात सुमारे ३२ कोटी ज्येष्ठ नागरिकांची संख्या असेल. म्हणजेच देशाच्या लोकसंख्येपैकी १९.५ टक्के लोक सेवानिवृत्तीच्या गटात येतील.
■ सन २०१९ मध्ये भारताची लोकसंख्येच्या सुमारे १० टक्के लोक किंवा १४ कोटी लोक ज्येष्ठ नागरिकांच्या कॅटेगिरीत येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!