*कोकण Express*
*कासार्डेत अपघातात बुलेट्स्वार जागीच ठार*
*वाहतूक पोलीस प्रकाश गवस, सुनील निकम अपघातस्थळी दाखल*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कासार्डेहून नांदगावला जात असताना कासार्डे-ब्राह्मणवाडी येथे मुंबई-गोवा महामार्गावर अपघात होत बुलेटस्वार दिगंबर केसरकर (४०, कासार्डे) हे जागीच ठार झालेत. दिगंबर केसरकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात आज सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातग्रस्त Mh 04 JR 9696 या बुलेटचे ही नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस प्रकाश गवस, सुनील निकम यांनी घटनास्थळी धाव घेत दिगंबर केसरकर यांचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवला. अधिक माहिती वाहतूक पोलीस घेत आहेत.