*कोकण Express*
*सुरेश प्रभूंच्या मानव साधन विकास संस्थेच्यावतीने सायकल वाटप सुरूच*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
मानव साधन विकास संस्था संचलित परिवर्तन केंद्र यांच्या संकल्पनेतून आणि गोवा विमानतळ प्राधिकरण यांच्या सीएसआर निधीतून सायकल बँक अंतर्गत जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग तर्फे माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेकांना सायकलचे वितरण करण्यात येत आहे. आज सावंतवाडी येथे काझी शहाबुद्दीन हॉल येथे माजगाव हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना १० सायकल भाजपच्या माध्यमातून भेट देण्यात आला आहे. संपूर्ण जिल्ह्यात आतापर्यंत या संस्थेच्या माध्यमातून १ हजार सायकल वाटप करण्यात आले आहेत. यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेविका दिपाली भालेकर, चराठा ग्रामपंचायत सदस्य अमित परब, अजय सावंत, परिणीती वर्तक,भाजप मंडळ उपाध्यक्ष दिलीप भालेकर, दादू कविटकर आदी उपस्थित होते.