*कोकण Express*
*“नको जामिन,नको अनुषंगिक तारण,मुद्रा योजनेच हेच धोरण”याप्रमाणे कर्ज द्या…!!अश्या मागणीचे निवेदन…*
*हक्क बचाव महाराष्ट्र कर्जदार , जामिनदार संघर्ष समिती राष्ट्रीयकृत बँकांकडे मागणी*
*हक्क बचाव संघर्ष समिती अध्यक्ष अँड.प्रसाद करंदीकर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
हक्क बचाव महाराष्ट्र कर्जदार , जामिनदार संघर्ष समिती मार्गदर्शक आप्पासाहेब घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अँड.प्रसाद करंदीकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवली शहरातील सर्व राष्ट्रीयकृत बँक व्यवस्थापकांना “नको जामिन,नको अनुषंगिक तारण,मुद्रा योजनेच हेच धोरण”याप्रमाणे कर्ज द्या…!!अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले.तसेच मुद्रा कर्ज योजनेचे फलक बँकेसमोर लावण्यासाठी महाराष्ट्र कर्जदार, जमीनदार, हक्क बचाव संघर्ष समिती अध्यक्ष अँड.प्रसाद करंदीकर यांनी बँक ऑफ इंडिया व्यवस्थापक किरण कुमार, स्टेट बँक व्यवस्थापक श्री. चौधरी यांना दिले.यावेळी काही बँकांना कर्ज प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. यावेळी अनंत पिळणकर,रुपेश जाधव, समीर आचरेकर, विनायक सापळे, अजय जाधव, रोशन जाधव, राजू सावंत, विनोद डगरे, सचिन पवार, सतीश जाधव, प्रसाद मुळे, माधवी मिठबावकर, दिव्या साळगावकर आदीसह कर्जदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या बँकेच्या शाखेकडुन पंतप्रधान मुद्रा योजने अंतर्गत सर्वसामान्य लोकांसाठी असणाऱ्या विनातारण विनाजामिन धोरणानुसार आर्थसहाय्य देण्यात यावे.“ नको जामिन , नको अनुषंगिक तारण ! मुद्रा योजनेच हेच धोरण ” या मथळ्याखाली प्रधानमंत्री मुद्रा योजनेबाबत भारत सरकार तर्फे जाहिरात आहे. सद्य स्थितीतील सर्व सामान्य जनतेची तसेच व्यावसायिकांची परिस्थिती पाहता त्यांना शासनाच्या धोरणाप्रमाणे अर्थसहाय्य करण्याची नितांत आवश्यकता आहे . कोरोना नंतरच्या पार्श्वभूमीवर अडचणीत आलेल्या बेरोजगार तरूणांना, तसेच व्यावसायीकांना आर्थिक हातभार लावण्याची गरज निर्माण झालेली आहे . या वस्तुस्थितीचे अवलोकन केले असता विषयात नमुद अर्थसहाय्य योजनेची तातडीने तसेच सहानुभूतीपूर्वक अंमलबजावणी होणे परिस्थितीनुरुप गरजेचे बनले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगार तरूण व व्यावसायिक यांचा आर्थिक स्तर उंचावण्याच्या दृष्टीकोनातून आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून आपणास प्राप्त अधिकारांचा वापर आजमितीस होणे अपेक्षित आहे . तरी वरील परिस्थितीचा विचार करून जास्तीत जास्त जिल्हावासीयांना विषयात नमुद योजनेचा फायदा करून देणेच्या दृष्टीकोनातून आपल्या स्तरावर प्रयत्न करण्यात यावेत,अशी मागणी अॅड . प्रसाद भालचंद्र करंदीकर यांनी बँक व्यवस्थापकांकडे केली आहे.त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.