*कोकण Express*
*मंत्री सतेज पाटील यांची कणकवली काँग्रेस’च्या पदाधिकांऱ्या घेतली भेट!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे काँग्रेसचे संपर्कप्रमुख तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांची कणकवली तालुक्यातील कॉग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गोकूळ दूध संघाच्या कार्यालयात भेट घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय काँग्रेस पक्ष वाढीसाठी सहकार्य करण्यासाठी चर्चा करण्यात आली.
मंत्री सतेज पाटील यांची कणकवलीतील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर आणि तालुका उपाध्यक्ष नीलेश मालंडकर व पदाधिकारी यांनी गोकुळ दूध संघाच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी कोल्हापूर येथील सल्लागार किसनराव फडतरे व कोल्हापूरमधील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.