*कोकण Express*
*माध्यमिक विद्यामंदिर कनेडीचे ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत यश*
*विजेत्या स्पर्धकांचा सतीश सावंत यांच्या हस्ते गौरव*
*कणकवली ः प्रतिनिधी*
ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री एम्. एम्. सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी प्रशालेमार्फत ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. नेहमी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करणारी प्रशाला अशी या प्रशालेची ख्याती आहे. सदर स्पर्धा ही चार गटात घेण्यात आली. *गट क्रमांक १ मध्ये इ. ५वी/६वी तील विद्यार्थ्यांचा समावेश होता. माझा आवडता क्रांतिकारक – भगतसिंग हा विषय या गटातील विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. या गटात यशस्वी विद्यार्थी खालीलप्रमाणे चैतन्य अरविंद शिरसाट – प्रथम,कु. तनुश्री प्रसाद मसुरकर – द्वितीय,अथर्व गंगाराम तांबे – तृतीय,कु. लावण्या तुकाराम खोचरे – उत्तेजनार्थ प्रथम, कु. कृपा अनिल पेडणेकर – उत्तेजनार्थ द्वितीय, या गटासाठी सौ. न्हिवेकर एस्. एम्. आणि श्री. सावंत डी. व्ही. यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. गट क्रमांक २ मध्ये इ. ७वी/८वी तील विद्यार्थ्यांचा समावेश होता. माझा आवडता क्रांतिकारक – स्वातंत्र्यवीर सावरकर हा विषय या गटातील विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. या गटात यशस्वी विद्यार्थी खालीलप्रमाणे कु. मैत्रेयी मकरंद आपटे – प्रथम, कु. रूतिका बाळकृष्ण सांगवेकर – द्वितीय,कु. गार्गी रामेश्वर सावंत – तृतीय,कु. योजना संदीप काणेकर – उत्तेजनार्थ प्रथम,कु. समिक्षा सुखदेव जाधव – उत्तेजनार्थ द्वितीय,या गटासाठी सौ. साटम एम्. एम्. आणि श्री. मसुरकर पी.एन् यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. गट क्रमांक ३ मध्ये इ.९वी/१०वी तील विद्यार्थ्यांचा समावेश होता. माझा आवडता क्रांतिकारक – वासुदेव बळवंत फडके हा विषय या गटातील विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. या गटात यशस्वी विद्यार्थी खालीलप्रमाणे कु. सानिका रामदास काळसेकर – प्रथम,कु. हृतिका रविकांत पेंडुरकर – द्वितीय,कु. अपूर्वा चारूहास आडकर – तृतीय,यशवर्धन मारोती गायकवाड – उत्तेजनार्थ प्रथम,कु. निर्जरा सुखदेव जाधव – उत्तेजनार्थ द्वितीय, या गटासाठी श्रीम. हाटले पी. एल्. आणि श्री. आपटे एम्. एन्. यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. गट क्रमांक ४ मध्ये इ.११वी/१२वी तील विद्यार्थ्यांचा समावेश होता. देशाच्या जडणघडणीत क्रांतिकारकांचे योगदान हा विषय या गटातील विद्यार्थ्यांना देण्यात आला होता.या गटातील यशस्वी विद्यार्थी खालीलप्रमाणे – अमोल संजय जाधव-प्रथम ,कु. अक्षता अरविंद सावंत – द्वितीय, कु. जुई सुधाकर सावंत – तृतीय कु. पायल रामचंद्र पारकर – उत्तेजनार्थ, या गटासाठी श्री. कोरडे बी. डी., सौ. म्हाडेश्वर पी. पी. आणि सौ. पटेल एच्. बी. यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सर्व विजेत्या स्पर्धकांना कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष सतीश सावंत व इतर मान्यवरांच्या प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. प्रशालेचे माजी मुख्याध्यापक ए. एस्. सावंत यांनी यांनी बक्षिसांचा सर्व खर्च केला. सर्व यशस्वी अध्यक्ष सतीश सावंत व सर्व पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन एल्. डी. सावंत व सर्व सदस्य, प्रशाला मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.या स्पर्धेचे यशस्वी आयोजन सहाय्यक शिक्षक मकरंद आपटे व प्रसाद मसुरकर यांनी केले.