*कोकण Express*
*मदतीपासून वंचित मच्छिमारांच्या प्रश्नावर माजी खास. निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर*
भाजप प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी मदतीपासून वंचित राहिलेल्या मच्छिमारांच्या प्रश्नावर सहाय्यक मस्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाला धडक देत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. यावेळी डॉ राणे यांनी चुकीच्या पद्धतीने झालेल्या पंचनाम्यांमध्ये मत्स्य विभागातील ज्यांचे ज्यांचे हात बरबटले त्या सर्वांची चौकशी आम्ही लावणार असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. तौक्ते वादळात मच्छीमार नाहीत, अशा लोकांना नुकसानभरपाई मिळालेली आहे. शिवसेनेच्या लेटरहेडवर मदत दिली गेली असा आरोप ग्रामस्थांनी केला होता. आज मालवण दौऱ्यावर असलेल्या माजी खासदार निलेश राणे मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. यावेळी धोंडी चिंदरकर, अशोक सावंत, बाबा परब, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, बाबा परब, अविनाश सामंत, महेश मांजरेकर, जॅक्सन, व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सहाय्यक मस्य व्यवसाय अधिकारी उपस्थित नसल्याने निलेश राणेंनी नाराजी व्यक्त केली ते पुढे म्हणाले, तौक्ते वादळानंतर देवगड, वेंगुर्ला तालुक्यात मच्छीमारांच्या नुकसानीचे पद्धतीने पंचनामे झाले ती पद्धत मालवण तालुक्यात का नाही अवलंबिण्यात आली ? मालवण तालुक्यात केवळ शिवसेनेशी संबंधित लोकांचे पंचनामे होऊन नुकसान भरपाई कशी काय दिली गेली? असा सवाल निलेश राणे यांनी केला यावेळी उपस्थित मच्छिमारांनी मच्छीमारांच्या नुकसानग्रस्त भागाची पंचयादी घालण्यास अधिकारी आले नाहीत. ज्यांचा मासेमारीशी संबंध नाही, मात्र, शिवसेनेशी संबंधित आहेत अशा लोकांना नुकसानभरपाई मिळाली. अद्यापही सुमारे २५० च्यावर ग्रामस्थ नुकसानीपासून वंचित आहेत असा आरोप केला. यावेळी निलेश राणे यांनी जे मच्छीमार नुकसान भरपाई पासून वंचित राहिले आहेत त्यांचा त्वरित अहवाल तयार करून वरिष्ठांना पाठवा आणि तात्काळ मदत वाटप करा. अधिकाऱ्यांनी आपले काम नाही केले तर संघर्ष होणारच असेही निलेश राणे म्हणाले.