*कोकण Express*
*आंबोली येथे मधुमक्षिका पालनतून रोजगार व मेनन कंपनीच्या जागेत उद्योग आणावा*
*आंबोली ः प्रतिनिधी*
आंबोली येथे मधुमक्षिका पालन व्यावायिकते च्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा. तसेच मेनन कंपनीच्या जागेत उद्योग व्यावसाय आणावा यासाठीचे निवेदन देवून मागणी आंबोली सरपंच गजानन वामन पालेकर आणि उपसरपंच सदाशिव उर्फ दत्तू वसंत नार्वेकर यांनी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्याकडे दिल्ली येथे भेट घेवून केली. त्यांनी आंबोली ग्रामपंचायतीच्या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की आंबोलीत मधुमक्षिका पालन व्यावसाय च्या माध्यमातून समृध्दी आणावी. या वेळी नारायण राणे यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून योजना राबवली जाईल.व युवकांना यात रोजगार मिळेल.असे आश्वासन दिल्याचे म्हंटले आहे. यावेळी त्यांनी राणे यांच्यासोबत अर्धा तास चर्चा केल्याचे सांगितले.यावेळी त्यांनी आंबोली येथील २१६ एकर जमीन त्यावेळी मेनन अँड मेनन कंपनीला कास्टींग उद्योगासाठी कबुलायतदार गावकर यांनी दिली होती मात्र १० एकर मध्ये त्यांची सर्व इमारत आणि सामुग्री आहे.बाकी गावाची फसवणूक केल्याने शासनाने जमीन ताब्यात घ्यावी आणि त्याठिकाणी उद्योग आणावा. तसेच चौ पदरिकरणाला पर्याय म्हणून बाजारपेठ बाहेरून सनसेट पॉइंट ते महादेवगड ते नारायणगड असा पर्यायी रस्ता करावा.आंबोली महदेवगड येथील रस्ता करावा यासाठी केंद्र सरकार अथवा खासदार निधी द्यावा अशी मागणी केली आहे.