*कोकण Express*
*शासकीय महाविद्यालयाच्या जागेच्या पाहणीसाठी लवकरच सिंधुदुर्गात येणार*
*अमित देशमुखांचा शब्द ; काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे व पदाधिका-यांनी घेतली भेट*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणा-या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पहाणी व निश्चिती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख लवकरच सिंधुदुर्ग दौ-यावर येणार आहेत,तसा त्यांनी शब्द दिला आहे.आज सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली देशमुख यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणा-या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बाबत चर्चा केली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकर होण्यासाठी जागेची निश्चिती करणे आवश्यक आहे.यासाठी जागेची पहाणी करण्यासाठी आपण लवकरच सिंधुदुर्गात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष इर्शाद शेख, सरचिटणीस प्रकाश जैतापकर, सचिव आनंद परूळेकर, बाप्पा नाटेकर, गणपत वेंगुर्लेकर, रत्नागिरीचे सुरेश काटकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय उपस्थित होते.