*दोडामार्ग ः प्रथमेश गवस*अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्रेरणा फाउंडेशनच्यावतीने राहाटोळी, घटनावाडी येथील गरजूंना जीवनावश्यक वस्तू वाटप केले. प्रेरणा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने राहाटोळी गाव व घटानावाडी बदलापूर दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने किराणा मालाचे व जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटपाचा कार्यक्रम केला. या कार्यक्रमाचे आयोजन प्रेरणा फाउंडेशन संस्थापिका / अध्यक्षा दिप्ती (प्रेरणा गांवकर यांनी केले. तसेच या कार्यक्रमासाठी सचिव वैभव कुलकर्णी, सभासद रोहन गावकर, उपसचिव दिनेश देसाई, उपखजिनदार दिव्या गावकर, विकास पवार ऋषिकेश देसाई यानी मोलाचं सहकार्य केले. तसेच या कार्यक्रमास अविनाश म्हात्रे, संजीव सुरेशचंद्र जैन, डॉ. रुपाली शिंदे, रेखा चौधरी, सुनील गावकर, प्रवीण चौधरी, सुनील इंगळे, मनोज दिवाडकर, मधुकर भोईर, संतोषकुमार टीजे यांनी मदत केली.