नागपूर मडगाव किंवा अमरावती मडगाव कोविड स्पेशल सुरू गणपती उत्सवाकरीता आरक्षण लवकर सुरू करण्याची मागणी:हर्षद भगत

नागपूर मडगाव किंवा अमरावती मडगाव कोविड स्पेशल सुरू गणपती उत्सवाकरीता आरक्षण लवकर सुरू करण्याची मागणी:हर्षद भगत

*कोकण Express*

*नागपूर मडगाव किंवा अमरावती मडगाव कोविड स्पेशल सुरू गणपती उत्सवाकरीता आरक्षण लवकर सुरू करण्याची मागणी:हर्षद भगत*

*बुलढाणा:*

महाराष्ट्राचे आराध्य दैवत व विदर्भातील प्रसिद्ध संत   गजानन महाराज मंदिर,अमरावती शहरातील वालगाव येथील संत गाडगेबाबा महाराज स्मारक ,नागपूर येथे महामानव डाॅ बाबासाहेब  आंबेडकर यांची चैत्यभुमी,वर्धा येथील महात्मा गांधी यांचे सेवाग्राम,बुलढाणा येथील नांदुरा येथील १०५ फुटी  हनुमानाची मूर्ती, मुर्तीजापुर येथील कार्तीकस्वामी मंदिर,कारंजा येथील दत्त गुरूचे  स्थान,रेणुकामाता मंदिर, नाशिक येथील शुर्पणखा स्मृतीस्थान,धुळे येथील देवापुर येथील स्वामीनारायण मंदिर,जळगाव येथील मुक्ताबाई,चांगदेव मंदिर, दर्शनाकरीता व पाहण्याकरिता अनेक भाविक शेगाव व बुलढाणा परिसरात येत असतात.धार्मिक क्षेत्र,उदयोग क्षेत्र,पर्यटन क्षेत्र,शैक्षणिक क्षेत्र,यांची नाळ जोडल्यामुळे प्रचंड प्रमाणात प्रवाशांची या गाडीसाठी मागणी आहे.रायगड जिल्ह्यातील पोलादपूर,महाड,गोरेगाव, माणगाव,श्रीवर्धन,रोहा,इंदापूर, कोलाड,नागोठणे,पेण रत्नागिरी  जिल्ह्यातील राजापुर,लांजा,रत्नागिरी,चिपळूण,गुहागर,खेड,मंडणगड,दापोली  सिंधुदुर्ग जिल्हातील कणकवली,कुडाळ,सावंतवाडी,वेंगुर्ले,मालवण,देवगड हे महत्वाचे ठिकाण असुन ही वेगाने विकसित होणारी शहरे आहेत दापोली येथे डाॅ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग परिसरात अनेक शाखा आहेत कोकण कृषी विद्यापीठामध्ये नाशिक,धुळे,जळगाव,बुलढाणा,अकोला,अमरावती,वर्धा,नागपूर या परिसरात येणारी लोकांची प्रवाशांची संख्या भरपूर आहे. नाशिक येथे द्राक्षांची,धुळे व नंदुरबार येथे लाल मिरचीची मोठी बाजारपेठ,पाचोरा,चाळीसगाव,भुसावळ,जळगाव केळीची मोठी बाजारपेठ,व केळीची मोठी उत्पादन केंद्र कोकणामध्ये येणाऱ्या केळी,द्राक्षे,संत्री,लाल मिरची रत्नागिरी हापुस आंबा व सिंधुदुर्ग प्रसिध्द देवगड हापुस आंबा,मालवणी खाजा,कडक बुंदीचे लाडू,चुरमुऱ्याचे लाडू, सावंतवाडी प्रसिद्ध लाकडी खेळणी,पेणचे पापड,कुरडई,पांढरा कांदा  या मार्केटमुळे आयात निर्यात होण्यास मदत होणार आहे तसेच कोकण ते खान्देश,विदर्भ असे महाराष्ट्र दर्शन म्हणून या गाडीला थिविम,सावंतवाडी रोड,कुडाळ,कणकवली,राजापुर रोड,विलवडे,अडवली,रत्नागिरी,चिपळूण,खेड,माणगाव,पेण या थांब्यावरून नागपूर करिता जाणारे असंख्य प्रवासी आहेत या भाविकांना दर्शनासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग परिसरातून रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे.तरी या रेल्वेच्या प्रवाशांची मागणी आहे की हि *मडगाव ते नागपूर  रेल्वेसेवेला पेण चाळीसगाव,जळगांव,नांदुरा,शेगांव,मुर्तीजापुर अधिकृत थांबे मिळावे    असा प्रस्ताव कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती गृपचे पेण तालुकाध्यक्ष श्री हर्षद भगत,दापोली मंडणगड तालुकाध्यक्ष वैभव बहुतूले,कुडाळ तालुकाध्यक्ष चैतन्य धुरी,कल्याण सावंतवाडी रेल्वे समन्वय समिती,पुणे कल्याण सावंतवाडी रेल्व,समन्वय समिती मुंबई अध्यक्ष सुनिल सिताराम उत्तेकर,सुधीरराठोड,शेखर नागपाल,पुरुषोत्तम मिश्रा,विजयकुमार मिश्रा,शिवकुमार जोशी,मयुर मुना,विजयकुमार राठी,पत्रकार राजकुमार व्यास,संजय त्रिवेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,रेल्वेमंत्री पियुष गोयल,अश्विन वैष्णव,अर्थमंत्री निर्मला सितारामन,मा अध्यक्ष रेल मंडल नवी दिल्ली,महाप्रबंधक मध्य रेल मुंबई,मंडल रेल प्रबंधक भुसावळ व नागपूर, स्टेशन प्रबंधक शेगांव, रेल्वे राज्य मंत्री राज्यमंत्री रावसाहेब दानवे,सडक परिवहन,राजमार्ग महामार्ग,रस्ते,वाहतूक,लहान,मध्यम,मोठे उद्योग मंत्री मा श्री नितीन गडकरी सो परिवहन भवन नवी दिल्ली,नागपूर कार्यालय येथे पाठविण्यात आला  आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!