*कोकण Express*
*ओसरगाव मळी वाडीवरील गणपती विसर्जन स्थळी चिखलाच्या समस्या मुळे ग्रामस्थां मध्ये नाराजी*
कोकणातील सर्वात मोठा सण गणेश चतुर्थी तोंडावर वर असताना कणकवली तालुक्यातील ओसरगाव मळी वाडी वरील गणेश विसर्जन स्थळी चिखलाच्या साम्राज्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. कित्येक शतकापासून मळी वाडीवरील विसर्जन स्थळी ग्रामस्थ आपल्या आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन करतात. त्यावेळी मोठ्या संख्येने विसर्जन स्थळी ग्रामस्थ जमा होतात. पण यावेळी तेथे एवढे चिखलाचे साम्राज्य आहे की विसर्जना पूर्वी पूजा,आरती करुन बाप्पाचे विसर्जन कसे करावे या चिंतेत ग्रामस्थ आहेत.