*कोकण Express*
*सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची आॅनलाईन सहविचार सभा संपन्न-श्री वामन तर्फे*
*सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ पदाधिकारी व सिंधुदुर्ग, रत्नागिरी,रायगड जिल्हा मुख्याध्यापक स़ंघ पदाधिकारी व सर्व मुख्याध्यापक यांची संयुक्त आॅनलाईन सहविचार सभा संपन्न झाली.सदर सभेत ३७५सभासदांनी सहभाग घेतला होता.उपस्थित राज्य महामंडळ पदाधिकारी व सर्व मुख्याध्यापकांचे स्वागत सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष श्री वामन तर्फे यांनी केले.प्रास्तावीक रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री विजय पाटील यांनी केले.सुत्रसंचलन राज्य महामंडळ हिशोब तपासणणीस श्री.संदेश राऊत यांनी केले.यासभेत महामंडळ कामकाजाचा आढावा अध्यक्ष श्री.विजयसिंह गायकवाड यांनी घेतला.तर मुख्याध्यापक महामंडळ पुढील वाटचालीबाबत माहिती माजी अध्यक्ष श्री.अरुण थोरात यांनी दिली.माध्यमिककडील पाचवी ,आठवी वर्ग प्राथमिकला जोडणे, मुख्याध्यापक पदोन्नती, सेवाज्येष्ठता-श्री जे के पाटील ,(उपाध्यक्ष),१९-२०वेतनेतर अनुदान -श्री आदिनाथ थोरात (सचिव), विनाअनुदानित शाळा अनुदान-श्री ज्ञानेश्वर म्हात्रे(अध्यक्ष ठाणे), शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नियुक्ती-श्री अमृत पांढरे (सांगली),कोरोना पार्श्र्वभूमीवर कमी केलेला अभ्यासक्रम, भविष्यातील परिक्षा व मुल्यमापन-श्री.महेंद्र गणपुले (पुणे), वरिष्ठश्रेणी-निवडश्रेणी-श्री सचिन नलावडे (अध्यक्ष सातारा),कोरोना काळातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थिती-श्री हरिश्चंद्र गायकवाड (अध्यक्ष पुणे),१३जुलैच्या आयुक्तांच्या शिफारशी-श्री.तानाजी माने(अध्यक्ष सोलापूर), अनुकंपा भरती डॉ.श्री आर.डी.निकम(जळगाव),डी.सी.पी.एस/एन पी एस-श्री भरत मोजर(सातारा) यांनी नियोजनबद्ध मार्गदर्शन केले.तसेच शिक्षण उपसंचालक यांच्या दिनांक २७/१०/२०च्या पत्राबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व सदर पत्रानुसार संभ्रम निर्माण झाल्यामुळे उपसंचालकांची भेट घेण्याचे ठरविले. या सभेचे तंत्रज्ञ म्हणून श्री प्रसाद गायकवाड सर व श्री उल्हास मिसाळ सर यांनी केले.उपस्थितांचे व मार्गदर्शकांचे आभार श्री.रामदास पाडगे,अध्यक्ष रायगड यांनी मानले.