*कोकण Express*
*मळगाव टॉवर सप्टेंबर महिन्यात कार्यान्वित ; पुकारलेले आंदोलन स्थगित..*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
आजगाव येथील मोबाईल टॉवर कार्यान्वित करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते हेमंत मराठे यांनी पुकारलेले उपोषण बी एस एन एल अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासन अंती स्थगित केले आहे.
आजगाव शेटकरवाडी येथे बीएसएनएल कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्यात आला आहे.टॉवर उभारून जवळपास वर्ष उलटून गेले तरी तो कार्यान्वित करण्यात आलेला नाही.यामुळें आजगाव,धाकोरा,भोम या परिसरातील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना नेटवर्क समस्या भेडसावत आहे.हा टॉवर सुरू करण्यासाठीं वारंवार करण्यासाठी वारंवार मागणी करूनही बीएसएनएल कडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. यामुळे सामाजिक कार्यकर्ते हेमंत मराठे यांनी पंधरा ऑगस्ट रोजी ग्रामस्थांसमवेत मोबाईल वर चढून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.यानंतर बी एस एन एल अधिकारी यांनी टॉवर बाबत गांभीर्याने विचार करत लवकरच सुरू करण्यात येईल असे आश्वासन मराठे याना दिले.मात्र नेमकी तारीख किती याचा उल्लेख करून लेखी पत्र द्या अन्यथा उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा मराठे यानी घेतला.यावेळी जिल्हा प्रबंधक देशमुख यांनी 30 सप्टेंबर 2021 पर्यंत सदरचा टॉवर कार्यान्वित करण्यात येईल असे लेखी पत्र मराठे यांना दिले.यावेळी आजगाव उपसरपंच सौ. तेली, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत काकतकर, अण्णा मालजी, ओकार प्रभु, आनंद मुळीक आदी उपस्थित होते.