*कोकण Express*
*नितेश राणे यांच्या इशाऱ्यानंतर बोर्डवे फाट्यावर तातडीने हायवेचे काम सुर*
*पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री व ग्रामस्थांनी वेधले होते लक्ष*
*कणकवली ः प्रतिनिधी*
वागदे हळवलं फाटा ते ओसरगाव बोर्डवे फाटापर्यंत महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत ग्रामस्थांकडून मागणी करण्यात आलेली कामे अखेर गुरुवारी सुरू करण्यात आली. गुरुवारी बोर्डवे फाटा येथे मिडल कट करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. आमदार नितेश राणे यांनी बुधवारी रात्री महामार्ग ठेकेदार व अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत ही कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार गुरुवारी बोर्डवे फाटा येथे काम हाती घेण्यात आले.
बुधवारी रात्री ओम गणेश बंगल्यावर झालेल्या बैठकीच्यावेळी ग्रामस्थांनी मागणी केलेल्या कामांबाबत ठेकेदार कंपनीचे लक्ष वेधण्यात आले बोर्डवे फाट्यावरुन येणाऱ्या ग्रामस्थांना टर्न मारण्यासाठी ओसरगाव टोल नाक्यावर जावे लागत होते. हा मिडलकट झाल्याने येथील ग्रामस्थांना सोयीचे होणार आहे. या बैठकीला दिलीप बिल्डकॉनचे प्रकल्प अधिकारी गौतम कुमार, परिहार उपस्थित होते. यावेळी वागदे, हळवल, ओसरगावमधील लोकांची मागणी असलेली उर्वरीत समस्या पंचायत समिती सदस्य मिलींद मेस्त्री, वागदे गावचे माजी सरपंच संदीप सावंत, ओसरगावचे माजी सरपंच अर्जुन देसाई यांनी मांडली असता लवकरच कामे लवकर पूर्ण करू असे आमदार नितेश राणे यांच्या सोबत झालेल्या चर्चेत सांगण्यात आले. गुरुवारी काम सुरू असलेल्या ठिकाणी मिलिंद मेस्त्री, सरपंच राजेंद्र मोडक, गणेश राणे आदी उपस्थित होते.
