*कोकण Express*
*भरणीत उद्या रानभाजी महोत्सव…!*
*सभापती मनोज रावराणे यांची प्रमुख उपस्थिती…!*
*तज्ज्ञ करणार शेतकर्यांना मार्गदर्शन…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय कणकवली व शेतकरी सल्ला समितीच्यावतीने गुरुवार 12 ऑगस्ट सकाळी 10.30 जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा भरणी येथे रान भाजी महोत्सव आयोजित केलेला आहे.
या रानभाजी उत्सवाचा शुभारंभ कणकवली पंचायत समितीचे सभापती मनोज रावराणे यांचे हस्त होणार आहे. यावेळी उपसभापती प्रकाश पारकर, पं. स. सदस्य तथा शेतकरी सल्ला समिती सदस्य गणेश तांबे, आनंद साळसकर, उपविभागीय कृषी अधिकारी एस. एस हजारे, कृषी अधिकारी बी. तोरणे, कृषी पर्यवेक्षक आर एस सावंत, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) व्ही.एम.पाटील, कृषी सहाय्यक रावराणे हे देखील उपस्थित राहणार आहे. तसेच या महोत्सवात फोंडा कृषी महाविद्यालयाचे प्रा. ओगले हे शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहे. रानभाजी महोत्सवास शेतकर्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कार्यालय व शेतकरी सल्ला समिती अध्यक्ष वसंत तेंडूलकर यांनी केले.