पंतप्रधान मुद्रा अर्थसहाय्य योजना सहानुभूतीपूर्वक राबविली पाहिजे

पंतप्रधान मुद्रा अर्थसहाय्य योजना सहानुभूतीपूर्वक राबविली पाहिजे

*कोकण Express*

*पंतप्रधान मुद्रा अर्थसहाय्य योजना सहानुभूतीपूर्वक राबविली पाहिजे*

*याबाबत जाणीव करण्यासाठी १८ रोजी जिल्ह्यात कार्यक्रम; अँड प्रसाद करंदीकर यांची माहिती*

*देवगड ः प्रतिनिधी*

सद्यस्थितीतील सर्व सामान्य जनतेची तसेच व्यावसायिकांची परिस्थिती पाहता त्यांना शासनाच्या धोरणाप्रमाणे अर्थसहाय्य करण्याची नितांत आवश्यकता आहे. कोरोना नंतरच्या पार्श्वभूमीवर अडचणीत आलेल्या बेरोजगार तरुणांना तसेच व्यावसायीकांना आर्थिक हातभार लावण्याची गरज निर्माण झालेली आहे. या वस्तुस्थितीचे अवलोकन केले असता पंतप्रधान मुद्रा अर्थसहाय्य योजनेची तातडीने तसेच सहानुभूतपूर्वक अंमलबजावणी होणे परिस्थितीनुरुप गरजेचे बनले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगार तरुण व व्यावसायिक यांचा आर्थिक स्तर उंचावण्याच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील सर्व वितीय संस्थांनी या सर्व परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून संबंधीत अधिका-यांनी त्यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून गरजूंना विनासायास अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे अपिक्षित आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मुद्रा योजना ही शासनाने जाहीर केलेली असतानाही त्या योजने अंतर्गत अर्थसहाय्य करण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करत असल्याचे संघटनेच्या सकृतदर्शनी निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत वित्तीय संस्थांना योजने बाबतची जाणीव करून देण्यासाठी पंतप्रधान मुद्रा योजनेच्या जाहीरातीचा बॅनर वित्तीय संस्थांच्या शाखाधिका-यांना भेट देण्याचे” आंदोलन संघर्ष समिती मार्फत करण्यात येणार आहे. प्रस्तुत आंदोलनात मुद्रा योजनेच्या जाहीरातीचे बॅनर राष्ट्रीयकृत बँकांच्या सर्व शाखाधिका-यांना देण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात दि. 18 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता देवगड येथून होणार असून कणकवली तसेच जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी व त्यानंतर त्याची सांगता कुडाळ या ठिकाणी सायंकाळी करण्यात येणार आहे.अशी माहिती अॅड. प्रसाद भालचंद्र करंदीकर अध्यक्ष महाराष्ट्र कर्जदार जामीनदार हक्कबचाव संघर्ष समिती यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.तसेच कोविड १९ चे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम पार पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!