मंगळवारपासून ठराविक इयत्तांच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी

मंगळवारपासून ठराविक इयत्तांच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी

*कोकण Express*

*मंगळवारपासून ठराविक इयत्तांच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी*

मागील वर्षभरापासुन राज्यात कोरोना प्रादूर्भावामुळे सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या. आता काही जिल्हयात निर्बंध शिथील केले आहेत. त्यामुळे बंद असलेल्या शाळांमधले वर्ग पुन्हा सुरु करण्यासाठी राज्य शासनानं परवानगी दिली आहे. त्यानुसार, याबाबतचा नवा शासन निर्णय आणि मार्गदर्शक सूचना आज जाहीर करण्यात आल्या.शासनाने ग्रामीण भागांमध्ये ज्या ठिकाणी कोरोना प्रादुर्भाव कमी झाला आहे, तिथे इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करायला परवानगी दिली होती. आता नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेल्या शहरी भागात इयत्ता ८ ते १२ वी चे वर्ग आणि ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते ७ वी चे वर्ग १८ ऑगस्टपासून सुरु करण्याला राज्य शासनानं परवानगी दिली आहे.
तरी शाळा सुरु करण्यासाठी समिती गठीत करण्यात येणार आहे.

Every school will have to formulate a Safe Transportation plan for the students. Schools to work in shifts/alternate days as the case may be to ensure only 15-20 students are present in class at a given time. One student will be seated per bench; distance of 6 ft between benches pic.twitter.com/ucZdyK6srJ

— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) August 10, 2021

शाळा सुरू करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना –

  1. शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित कराव्यात. टप्प्याटप्प्याने शाळा भरवण्यात यावी.
  2. सोबतच शाळेत येणाऱ्या प्रत्येकाची थर्मल स्क्रीनिंग चाचणी घेण्यात यावी.
  3. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची सोय प्रशासनाकडून केली जावी. एका बाकावर एकच विद्यार्थी व दोन बाकामध्ये मध्ये सहा फुटाचे अंतर.
  4. एका वर्गात जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी असावे. कोरोना सदृश्य कोणतीही लक्षणे दिसल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणे आणि त्याची योग्य ती चाचणी करावी.
  5. हात धुण्याच्या सर्व ठिकाणी साबण, हॅन्ड वॉश आणि स्वच्छ पाण्याची व्यवस्था असावी.
  6. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दरदिवशी दोन सत्रात भरवण्यात याव्यात.
  7. प्रत्यक्ष वर्गाचा कालावधी 3 ते 4 तासापेक्षा अधिक नसावा.
  8. जेवणाची सुट्टी सुद्धा नसेल.
  9. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक यांनी शाळेच्या परिसरात मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील व कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे.
  10. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत्व पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!