*कोकण Express*
*संजय तांबे यांच्या ‘विविधा’ ग्रंथाचे कवी सतीश सोळांकूरकर यांच्या हस्ते 15 रोजी प्रकाशन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्गातील ज्येष्ठ लेखक संजय तांबे ( फोंडाघाट) यांच्या प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘विविधा’ या ग्रंथाचे प्रकाशन रविवार 15 ऑगस्ट रोजी सायं. 6 वा. मुंबई येथील ज्येष्ठ कवी सतीश सोळांकूरकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
विविधाचे ऑनलाइन प्रकाशन होणार असून यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी रमेश सावंत, तरुण ललित लेखक प्रा. वैभव साटम (मुंबई) आणि समाज साहित्य संघटनेचे अध्यक्ष कवी मधुकर मातोंडकर ( सावंतवाडी) हे आपले विचार व्यक्त करणार आहेत. तर यावेळी विविधाचे लेखक श्री तांबे हे आपली लेखना मागील भूमिका मांडणार आहेत.
श्री तांबे हे कणकवली खारभूमी विकास उपविभाग येथे गेली अनेक वर्षे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत.सुमारे 35 वर्षं ते विविध वृत्तपत्र, नियतकालिकांमधून निष्ठेने विविध विषयावर लेखन करत असतात. समाज-सांस्कृतिक-राजकीय- लोकजीवन आधी अनुषंगाने त्यांचे लेखन सातत्याने प्रसिद्ध होत असते. या लेखनाचे विविधा हे ग्रंथरूप असून प्रभा प्रकाशनाने अतिशय देखण्या स्वरूपात या ग्रंथाची निर्मिती केली आहे. ललित लेखक वैभव साटम यांनी विविधा ग्रंथाची पाठराखण केली असून त्यात ते म्हणतात, संजय तांबे हे लेखक समाज भिमुख असल्याने त्यांच्या या लेखनाचा सहसंबंध थेट समाजाची जोडता येतो. आजच्या काळात अशा लेखनाकडे नव्या पिढीचे काहीसे दुर्लक्ष होत असताना लेखनातून समाजभान राखण्याची भूमिका वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने तांबे यांचे हे लेखन प्रत्येककारी ठरेल. प्रभा प्रकाशनातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमात साहित्य रसिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- मो.नं. 9420261888